दिल्लीतील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी दाखल केलल्या स्टेटस रिपोर्टवरून उच्च न्यायालयाने फटकारले.
नवी दिल्ली- दिल्लीतील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी दाखल केलल्या स्टेटस रिपोर्टवरून उच्च न्यायालयाने फटकारले. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना जलद गतीने तपास करण्याचे आदेश दिले होते. तसेच याचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार उपायुक्त छाया शर्मा यांनी शुक्रवारी स्टेटस रिपोट न्यायालयात सादर केला.
विशेष म्हणजे या घटनेची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती. दिल्ली पोलिसांना सादर केलेल्या स्टेटस रिपोट अस्पष्ट असल्याचे सांगत न्यायमूर्ती डी. मुरुगसेन आणि न्यायमूर्ती राजीव शहा एन्डलॉ यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पोलिसांनी नऊ जानेवारपर्यंत सविस्तर रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो की या प्रकरणातील सर्व तपशीलासह आणि विनाविलंब अहवाल सादर करा अशा शब्दात न्यायालायने पोलिसांना फटकारले आहे.
न्यायालयाने दिल्ली पोलिस आयुक्तांना घटना घडली तेव्हा परिसरात गस्त घालणारे पोलिस कर्मचारी कोठे होते, तसेच त्यांनी नेमकी कोणती कारवाई केली याचे तपशील देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, पोलिस उपायुक्त छाया शर्मा यांनी सादर केलेल्या तपास अहवालात एकाही पोलिस अधिका-याचे तपशील दिलेले नाहीत याकडे लक्ष वेधून आपण समाधानी नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
धावत्या बसमध्ये तब्बल ४० मिनीटे हा प्रकरा सुरु होता तेव्हा या परिसरातील पोलिस कर्मचारी काय करत होते याची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या संदर्भातील पुढील सुनावणी नऊ जानेवारी रोजी होणार आहे.
संसदीय समितीची अधिका-यांना समन्स
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी, संसदीय समितीने केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरज कुमार यांना समन्स बजावून २७ डिसेंबरला होणा-या बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली गृह खात्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत देशातील, विशेषत: दिल्लीतील सुरक्षा स्थितीवर चर्चा होणार आहे. यावेळी जलदगती न्यायालये आणि कठोर शिक्षा यावरही चर्चा होईल.
[EPSB]
दिल्ली बलात्कार : एका आरोपींस अटक »
चालत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार करणा-या सहा जणांपैकी शुक्रवारी आणखीन एका फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे.…
[/EPSB]