दहशतवाद्याने इस्लामाबादमधील स्थानिक न्यायालयाच्या आवारात अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एका न्यायाधीशासह पाचजणांचा मृत्यू झाला आहे.
इस्लामाबाद – पाकिस्तानी लष्कराने वझरिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात मोहिम उघडल्यानंतर दहशतवाद्यांनीही पाकिस्तानात रक्तपातास सुरुवात केली आहे.
सोमवारी सकाळी एका दहशतवाद्याने इस्लामाबादमधील स्थानिक न्यायालयाच्या आवारात अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात न्यायाधीश रफाकत अवान यांच्यासह अकराजणांचा मृत्यू झाला आहे. २५ जण जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा पथके पाठवण्यात आली आहेत. हा दहशतवादी अजूनही न्यायालयाच्या आवारात असून, पाकिस्तानी रेंजर्सनी न्यायालयाच्या परिसराला वेढा घातला असून, शोध मोहिम सुरु आहे. हल्लेखोराने दोन ग्रेनेडचाही वापर केला.