पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन १९ ऑक्टोबरपासून पुन्हा नॅरोगेजवर चालवण्यात येणार आहे.
कर्जत – पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन १९ ऑक्टोबरपासून पुन्हा नॅरोगेजवर चालवण्यात येणार आहे. गाडीच्या इंजिनाच्या रंगरगोटीचे व दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून नव्या हंगामासाठी गाडीचे इंजिन लोकशेडमध्ये आणले आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती असल्यामुळे मिनीट्रेन बंद ठेवली जाते. या काळात रेल्वेमार्गाची दुरुस्ती केली जाते. इंजिनाची आणि डब्यांचीही दुरुस्ती केली जाते. त्यासाठी हे डब्बे कुडरूवाडी, परळ किंवा अन्य ठिकाणच्या लोकोशेडमध्येही पाठवले जातात. पावसाळा संपल्यानंतर दिवाळीचा हंगाम सुरू होतो. या काळात माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी वाढते.
अमन लॉज-माथेरान शलटसेवा सुरू झाल्यामुळे गाड्यांच्या फे-या वाढल्या आहेत. नॅरोगेज मार्गही पुढील हंगामासाठी सज्ज झाला आहे. शनिवार, रविवार या दिवशी मिनीट्रेनच्या पाच फे-या तर अन्य दिवशी चार फे-या केल्या जाणार आहेत. त्यातच माथेरान-अमनलॉज शटलसेवेमुळे पर्यटकांना टॅक्सीने दस्तुरीनाका आणि पुढे शटलचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्यामुळे गाडीचे आरक्षण करण्यासाठी पर्यटकांची रिघ सुरू झाली आहे.
[EPSB]
शटल सेवेमुळे हातरिक्षावाले अडचणीत
२९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या अमनलॉज-माथेरान शटल सेवेने अल्पावधीतच प्रचंड वेग पकडला असला तरी या सेवेमुळे येथील अश्वपालांसोबतच हातरिक्षाचालक मात्र अडचणीत आले आहेत.
[/EPSB]