कर्जत-माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या नेरळ-बेकरे रस्त्याची सध्या चाळण झाली आहे.
नेरळ – कर्जत-माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या नेरळ-बेकरे रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. मागील दोन वर्षात या डागडुजी केली नसल्याने रस्त्यात खड्डे आणि खड्डेच आहेत. रस्त्यावरील डांबर उखडल्याने रस्ता अरुंद झाला आहे. जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांत नाराजी आहे.
नेरळ-बेकरे रस्त्याचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २००५मध्ये झाले. जवळपास नऊ वर्षाचा कालावधी लोटला, मात्र या रस्त्याच्या डागडुजीचे काम अद्याप जिल्हा परिषदेकडून झालेले नाही. बेकरे गावातील नागरिकांना नेरळ तसेच रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी याच मुख्य रस्त्यातून प्रवास करावा लागतो.
रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद दुर्लक्ष करत असल्याने वाहनचालकांना पाण्याने भरलेल्या खड्डयांतून वाहने आदळत-आपटत प्रवास करावा लागत आहे. परिणामी वाहनांचे पार्ट ढिले पडून वाहन दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. या गंभीर समस्येवर जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील वाहनचालकांनी तसेच प्रवाशांनी संबंधित प्रशासनाला केली आहे.