नेपाळमधल्या विनाशकारी भूकंपात बॉलिवूडमधल्या आठ जणांचा बळी गेला आहे.
मुंबई – नेपाळमधल्या विनाशकारी भूकंपात बॉलिवूडमधल्या आठ जणांचा बळी गेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसेच्या आगामी चित्रपटाच्या युनिटमधील आठ सदस्यांचा भूकंपात मृत्यू झाला आहे.
स्वत: मुग्धाने टि्वटरवरुन या दुखद घटनेची माहिती दिली. पोखरामध्ये मुग्धाच्या या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. मुग्धा आणि तिचा सहकलाकार रसलान मुमताझ हे चित्रीकरण आटोपून परतल्याने या दुर्घटनेतून बचावले.
युनिटमधील आठ सदस्यांच्या मृत्यूच्या बातमीने मुग्धाला धक्का बसला. मनोज धामन दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात मुग्धा आणि रसलानची मुख्य भूमिका आहे.
भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. नेपाळमधल्या या विनाशकारी भूकंपात पाच हजारांपेक्षा जास्त नागरीकांचा बळी गेला असून, मृतांचा आकडा दहा हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.