उपनगर जिल्हा मतदार संघात पेडन्यूज व आचार संहिता भंग करणाऱ्यांवर निवडणूक कार्यालयाने करडी नजर ठेवली आहे.
मुंबई – उपनगर जिल्हा मतदार संघात पेडन्यूज व आचार संहिता भंग करणा-यांवर निवडणूक कार्यालयाने करडी नजर ठेवली आहे. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी खास मीडिया सेल तयार करण्यात आला आहे.
वर्तमान पत्रात येणा-या बातम्यांची प्रशिक्षित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून छाननी केली जाते आहे. इलेक्ट्रॉनिक वाहिन्या, के बलवरील रोजच्या बातम्यांचे ६९७ तासांचे रेकॉर्डिग केले जाते आहे. तसेच उमेदवारांकडून आचारसंहिता भंग केली जाते आहे का यासाठी भरारी पथक, तसेच चित्रिकरण करण्यासाठी टीमचे लक्ष आहे.
वर्तमानपत्रात येणा-या बातम्या पेडन्यूज आहे, का याची रोजच्यारोज तपासणी केली जाते आहे. संशयित पेडन्यूजची नोंद होऊन तशा बातम्यांची छाननी क रून खातरजमा केली जाते आहे. तसेच वाहिन्या व केबलवर प्रसारित होणा-या बातम्यांवर नियुक्त कर्मचारी अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष आहे. या बातम्यांचे ६९७ तासाचे रेकॉर्डिग केले जाते आहे.