दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने एक ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
नवी दिल्ली- दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने एक ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. या प्रकरणातील महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आरोपींना देण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवा खेत्रपाल आणि प्रतिभा रानी यांच्या खंडपीठासमोर सरकारी वकिलांनी सादर केलेली कागदपत्रे व चार आरोपींच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रात तफावत आढळली. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली.
येत्या दोन दिवसात खटल्याची कागदपत्रे बचाव पक्षाच्या वकिलांना देण्याचे विशेष सरकारी वकील दयान कृष्णन यांनी मान्य केले. तसेच कलम १६१ आणि १६४ अंतर्गत यासंदर्भातील साक्षीदारांची साक्ष हिंदीतून इंग्रजीमध्ये भाषांतरीत करण्याचे आदेशही न्यायालयाने रजिस्ट्रार कार्यालयाला दिले.