युवा नेते नितेश राणे हेच वैभववाडीला वैभव मिळवून देतील. तालुका विकासाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले व्हिजन डॉक्युमेंटरीमधील सर्व विषय मार्गी लावण्याची जिद्द नितेश राणे यांच्यामध्ये आहे.
वैभववाडी- युवा नेते नितेश राणे हेच वैभववाडीला वैभव मिळवून देतील. तालुका विकासाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले व्हिजन डॉक्युमेंटरीमधील सर्व विषय मार्गी लावण्याची जिद्द नितेश राणे यांच्यामध्ये आहे.
अशा भावना सांगुळवाडी, करुळ, वैभववाडी या ठिकाणच्या मतदारांनी व्यक्त केल्या. कल्याण-डोंबविली महानगरपालिकेचे माजी महापौर शाहू सावंत यांनी वैभववाडीतील काही गावांना प्रचारादरम्यान भेट दिली.
तालुक्यात सर्वागीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या प्रयत्नाने प्रकल्प मार्गी लागले. नारायण राणे यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याच्या मागे उभे राहाणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे मत शाहू सावंत यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी माजी सभापती नासीर काझी, जि. प. सदस्य स्नेहलता चोरगे आदी उपस्थित होते.