नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकऱणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या १८ जवानांची जामीनावर सुटका कऱण्यात आली आहे.
नाशिक – नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकऱणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या १८ जवानांची जामीनावर सुटका कऱण्यात आली आहे.
लष्करी अधिका-यांना अटक केल्याने संतापलेल्या लष्करी जवानांच्या एका गटाने बुधवारी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यावर लष्करी जवानांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले होते. या प्रकऱणातील आरोपी जवानांना न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर लगेचच या जवानांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
देवळाली येथे लष्कराचा तोफखान्याचा मोठा तळ आहे. या तळामध्ये काम करणा-या लष्करी अधिका-याने उपनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात मंगळवारी रात्री आपली कार अवैधरित्या उभी केली होती. त्याला पोलिसांनी विरोध केला. अखेर पोलिसांनी लष्करी अधिका-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. काही वेळानंतर या अधिका-याची सुटका करण्यात आली.
या प्रकाराने संतप्त झालेल्या १०० ते दीडशे जवानांनी बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड सुरू केली. तसेच त्यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलीस अधिका-यांनाही त्यांनी मारहाण केली होती. यामध्ये तीन अधिकारी जखमी झाले होते. याप्रकरणी १८ जवानांना ताब्यात घेण्यात आले होते.