नालासोपारा परिसरात भरदिवसा एक चाळ बांधकाम करणा-या व्यक्तीची हत्या करण्यात आली. मंगेश यादव असे त्याचे नाव आहे.
विरार- नालासोपारा परिसरात भरदिवसा एक चाळ बांधकाम करणा-या व्यक्तीची हत्या करण्यात आली. मंगेश यादव असे त्याचे नाव आहे.
नालासोपारा, वाघेश्वरी हिल परिसरात हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास मंगेश यादव आपल्या राहत्या घराच्या गणेश मंदिराचे काम सुरू असताना त्याची पाहणी करत उभा होता. त्यावेळी तेथे आलेल्या चौकडीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या मंगेश यादव याला नालासोपारा येथील रुग्णालयात हलवले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्याच्या हत्येमागील नेमके कारण उलगडलेले नाही. नालासोपा-यात बिल्डर हत्येचे हे दुसरे प्रकरण आहे. याआधी राजेश सिंह या बिल्डरची हत्या करण्यात आली होती. मंगेश यादव हे बहुजन विकास आघाडी पक्षाचे वार्ड अध्यक्ष आहेत. या घटनेने बिल्डर लॉबी हादरली आहे.