नालासोपारा पूर्वेला एमडी नगरमधील महालक्ष्मी अपार्टमेंट या रहिवाशी इमारतीतील एका घरामध्ये शनिवारी सकाळी स्फोट झाला.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/08/gas-pipeline-blast.jpg)
वसई – नालासोपारा पूर्वेला एमडी नगरमधील महालक्ष्मी अपार्टमेंट या रहिवाशी इमारतीतील एका घरामध्ये शनिवारी सकाळी स्फोट झाला. या स्फोटात सात ते आठ जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
महालक्ष्मी अपार्टमेंट इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरामध्ये हा स्फोट झाला. या स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
या स्फोटाचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. सुरक्षिततेच्या कारणास्तव महालक्ष्मी अपार्टमेंट आणि आसपासच्या इमारती रिकामी करण्यात आल्या असून, अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. हा सिलिंडर स्फोट असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सिलिंडर स्फोटाचा आवाज इतका दूरवर कसा ऐकू जाईल अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरु आहे.