नालासोपारा येथे दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला. यात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला.
![Mumbai building collapse](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/06/dahisar.jpg)
वसई- नालासोपारा-आचोळे रोडवरील आदर्श कपोलनगर या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कोसळल्याने राजेश प्रजापती या पादचा-याचा मृत्यू झाला. तर विकास संजय यादव (१२) हा मुलगा गंभीर जखमी असून, त्याच्यावर अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे दोघेही या इमारतीखालून चालले असतानाच हा अपघात झाला. आदर्श कपोलनगर ही २८ वर्षे जुनी इमारत असून, या इमारतीत २८८ कुटुंबे आहेत. ही इमारत धोकादायक असल्याने वसई-विरार महानगरपालिकेने या रहिवाशांना नोटिसही दिली होती. मात्र रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास नकार दिला होता.
रविवारच्या अपघातानंतर ही इमारत तातडीने रिकामी करण्यात आली आहे.