गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ठाकरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मुंबई- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ठाकरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शनिवारी निधन झाले होते.
नरेंद्र मोदींनी ‘मातोश्री’ला भेट देऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली आणि त्याचे सांत्वन केले. मोदींनी बाळासाहेबांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेतले आणि त्यावर फुले वाहिली.
बाळासाहेबांचे कार्य प्रेरणादाई असून जनता त्यांना कधीच विसरु शकणार नाही असे मोदी यांनी सांगितले. मोदींनी दूरध्वनीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सांत्वन केले.
[EPSB]
जनसागरात सूर्य मावळला
साहेबांच्या सभांसाठी बॅनर लावणं, कमानी उभारणं, प्रचारफे-यांमध्ये खड्या आवाजात घोषणा देणं, तहान-भूक विसरुन काम करणं…गेली कित्येक दशकं कार्यकर्त्यांच्या हे अंगवळणीच पडलं होतं. साहेबांची एक गर्जना ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून शिवर्तीर्थावर जमणारी मराठी मनं आज तिच गर्जना विरताना आपल्या हदयसम्राटाला शेवटचा मुजरा करण्यासाठी त्याच ठिकाणी जमली होती. पदपथांपासून, पुलांपर्यंत जिथे जागा मिळेल तिथे तसन् तास ठाण मांडून […]
साहेब, तुम्ही हवे होता!
मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी दूरचित्रवाणीवर पाहिली आणि मन हेलावून गेले. त्यांच्या आठवणीने डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
[/EPSB]