गुजरात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ‘नमो गुजरात’ या वाहिनीच्या माध्यमातून प्रचार करणा-या नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.
अहमदाबाद – गुजरात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ‘नमो गुजरात’ या वाहिनीच्या माध्यमातून प्रचार करणा-या नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. नमो गुजरात ही वाहिनी तात्काळ बंद करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने मोदींना दिले आहेत.
गुजरात निवडणूकीसाठी हायटेक प्रचार करणा-या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘नमो गुजरात’ ही वाहिनी लॉन्चिंगच्या दुस-या दिवशीच बंद करावी लागली. निवडणूक आयोगाने ब्रॉडकास्टर्सच्या संघटनेची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत ‘नमो गुजरात’ या वाहिनीचं जोपर्यंत क्लियरन्स मिळत नाही तोपर्यंत प्रसारण थांबवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले.
‘नमो गुजरात’ ही वाहिनी दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी लॉन्च करण्यात आली होती. मोदीविरोधी गटाने या वाहिनीविरोधात आंदोलन केलं. काँग्रेसेनेही या वाहिनीच्या प्रसारणाला विरोध दर्शवला. ‘नमो गुजरात’ला मिळणा-या फंडची चौकशी केली जावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली होती.
दरम्यान नरेंद्र मोदी यांनी याआधीसुद्धा निवडणूकीच्या प्रचारासाठी ‘वंदे गुजरात’ नावाचं इंटरनेट प्रोटोकॉल लॉन्च केलं होतं. पण निवडणूक आयोगाने त्यावरही बंदी घातली होती.