इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील नऊ वर्षाच्या बालिकेवर १६ वर्षीय चुलत काकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.
इगतपुरी- इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील नऊ वर्षाच्या बालिकेवर १६ वर्षीय चुलत काकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी घराजवळ राहत असलेल्या आपल्या पुतणीला शौचालयात घेऊन गेला. तिला अश्लिल चित्रफीत दाखवत तिच्यावर बलात्कार केला. या प्रसंगाने ती चिमुरडी भयभीत झाली. तिने घडला प्रसंग आपल्या कुटुंबियांना सांगितला.
चिमुरडीच्या वडिलांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयिताला अटक केली. या घटनेनंतर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.