धावत्या लोकलमधून महिलेची पर्स खेचण्याच्या प्रयत्नात तिला रेल्वेतून खाली पाडणा-या आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्य प्रदेशमधून अटक केली.
मुंबई- धावत्या लोकलमधून महिलेची पर्स खेचण्याच्या प्रयत्नात तिला रेल्वेतून खाली पाडणा-या आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्य प्रदेशमधून अटक केली.
पाच सप्टेंबर रोजी कोपरखैरणे येथे धावत्या लोकलमधून आरोपीने आरती गोलपकर या महिलेची पर्स खेचताना त्या गाडीतून खाली पडल्या होत्या. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
हरीश राठोड (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे. पाच सप्टेंबर रोजी आरती गोलपकर ही महिला दरवाजाजवळ उभी राहून कोपरखैरणे ते ठाणे प्रवास करत असताना राठोडने लोखंडी सळीच्या सहाय्याने आरतीची पर्स खेचली. त्यामुळे आरतीचा तोल जाऊन ती खाली पडली. राठोडने आरतीजवळील दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी ३२ जणांना ताब्यात घेतले असता, २००८ रोजी अशा प्रकारच्या चोरीमध्ये अटक केलेला आरोपी राठोड हा बेपत्ता असल्याचे समोर आले.