ग्रामीण भागातलं राजकारण हा एकेकाळी मराठी चित्रपटांचा आवडता विषय होता. पण ख-या अर्थाने राजकीय म्हणावे असे चित्रपट मराठीत मोजकेच आहेत.
ग्रामीण भागातलं राजकारण हा एकेकाळी मराठी चित्रपटांचा आवडता विषय होता. पण ख-या अर्थाने राजकीय म्हणावे असे चित्रपट मराठीत मोजकेच आहेत. ‘वझिर’सारखा उत्कृष्ट राजकीयपट देणारे निर्माते-दिग्दर्शक उज्ज्वल ठेंगडी यांनी पुन्हा हे आव्हान स्वीकारलं असून ‘धर्मातर’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच बुजुर्ग दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते पार पडला.
राजकारणात आपापल्या सोयींप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचा वापर करणा-यांवर प्रहार करणारा हा चित्रपट असेल, असं उज्ज्वल ठेंगडी यांनी यावेळी सांगितलं. या चित्रपटात डॉ. विलास उजवणे, शरद पोंक्षे, स्मिता तांबे, अश्विनी एकबोटे, हेमांगी कवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.