देशभरात युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया(यूआयडीएआय)ने ८१.७८ कोटी आधार कार्ड वितरित केल्याची माहिती राव इंद्रजित सिंग यांनी लोकसभेत दिली.
नवी दिल्ली – देशभरात युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया(यूआयडीएआय)ने ८१.७८ कोटी आधार कार्ड वितरित केल्याची माहिती राव इंद्रजित सिंग यांनी लोकसभेत दिली.
२०११ मधील जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी इतकी आहे. एकूण लोकसंख्येपैकी ६७ टक्के नागरिकांना २० एप्रिलपर्यंत यूआयडीएआयकडून आधारकार्डचे वितरण झाल्याचे सिंग यांनी लेखी उत्तरादरम्यान सांगितले.
उत्तर प्रदेशमधील १९.९५ कोटी लोकसंख्येपैकी सर्वाधिक १०.४८ कोटी आधार कार्डांचे वितरण झाले आहेत.तर महाराष्ट्रात ९.१९ कोटी आधार कार्डचे वितरण झाले आहे.
त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये ६.१२ कोटी आधार कार्डचे वितरित करण्यात आले. १८ अथवा त्याहून अधिक वयोगटातील ८४.९ टक्के नागरिकांना आधार कार्ड देण्यात आले आहेत.