मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष देवदास मटाले यांची सलग तिस-यांदा निवड झाली आणि त्यांनी हॅट्ट्रिक साधली.
मुंबई- मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष देवदास मटाले यांची सलग तिस-यांदा निवड झाली आणि त्यांनी हॅट्ट्रिक साधली. चुरशीच्या लढतीत मटाले यांनी १७१ मते मिळवून त्यांचे प्रतिस्पर्धी शशिकांत सांडभोर यांचा पराभव केला.
उपाध्यक्षपदी विजयकुमार बांदल आणि प्रभाकर पवार हे विजयी झाले. कार्यवाहकपदी विद्यमान कार्यवाहक प्रमोद तेंडुलकर, कोषाध्यक्षपदी दीपक म्हात्रे हे पुन्हा विजयी झाले. तसेच विश्वस्तपदी अजय वैद्य आणि प्रकाश कुलकर्णी यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणीसाठी खालील सदस्य विजयी झाले..
सत्यवान ताठरे (लोकसत्ता)
आत्माराम नाटेकर (लोकसत्ता)
कल्पना राणे (महाराष्ट्र टाइम्स)
महेश विचारे (महाराष्ट्र टाइम्स)
दीपक परब (नवशक्ति)
शैलेंद्र शिर्के (प्रहार)
विष्णू सोनवणे (सकाळ)
सुधाकर कश्यप (आयबीएन लोकमत)
स्वाती घोसाळकर