ऐन दिवाळीत डिझेल आणि गॅस दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- ऐन दिवाळीत डिझेल आणि गॅस दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. डिझेलच्या दरात तातडीने पाच रुपयांनी वाढ करण्याची शिफारस किरीट पारिख समितीने केली आहे. तसेच अनुदानीत घरगुती गॅस सिलिंडरची संख्या नऊवरून सहा करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
किरीट पारिख समितीने पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोयली यांच्याकडे बुधवार अहवाल सादर केला. डिझेल दरवाढी बरोबरच रॉकेलच्या दरात चार रुपयांची तर गॅसच्या दरात २५० वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पारिख यांच्या अध्यक्षतेखाली या समितीला डिझेल आणि रॉकेलच्या दर निश्चित करण्यासंदर्भात सूचना देण्यास सांगितले होते.