दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी तिस-यांदा स्टेटस रिपोर्ट सादर केला.
नवी दिल्ली – दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी तिस-यांदा स्टेटस रिपोर्ट सादर केला. या अहवलात दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली आहे.
याआधी पोलिसांनी सादर केलेल्या स्टेट्स रिपोर्टमध्ये १६ डिसेंबरला गस्तीवर असलेल्या पोलिसांची नावे न्यायालयात सादर का केली नाहीत? या प्रकरणात केवळ कनिष्ठ पोलिसांवर कारवाई का केली? वरिष्ठ पोलिसांवर कारवाई का केली नाही? असे प्रश्न न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारले होते. त्यामुळे यावेळी सादर करण्यात आलेल्या स्टेट्स रिपोर्टमध्ये दिल्ली पोलिसांनी न्यायालयाची माफी मागितली आहे.
त्यादिवशी ड्यूटीवर असलेल्या पोलिसांची नावे स्टेट्स रिपोर्टमध्ये जाहीर न केल्याबद्दल मी न्यायालयाची माफी मागतो, असे दिल्ली पोलिसांचे वकिल दयान कृष्णा यांनी न्यायाधीश डी.मूरुगसेन यांच्या खंडपीठापुढे स्पष्ट केले.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने गृहमंत्रालयालाही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पीसीआर व्हॅनची संख्या वाढवण्याचेही निर्देश दिले. सध्या दिल्लीत ६१७ पीसीआर व्हॅन कार्यरत असून या व्हॅनच्या माध्यमातून गस्त वाढवण्यात यावी असेही न्यायालयाने सांगितले. त्याशिवाय गाड्यांवरील काळ्या काचा त्वरित काढण्याचे निर्देशही न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले.
[EPSB]
पोलिस आयुक्तांना का निलंबित केले नाही?
दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कालप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना पुन्हा एकदा फटकारले आहे.
[/EPSB]