दिल्ली- आग्रा मार्गावर चालवण्यात येणा-या सेमी हायस्पीड ट्रेनचे ‘गतिमान एक्स्प्रेस’ असे नामकरण करण्यात येणार असून या ट्रेनची वेगमर्यादा वाढवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली- दिल्ली- आग्रा मार्गावर चालवण्यात येणा-या सेमी हायस्पीड ट्रेनचे ‘गतिमान एक्स्प्रेस’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या ट्रेनची वेगमर्यादा वाढवण्याबरोबरच अद्ययावत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दिल्ली – आग्रा हे अंतर १०५ मिनिटात कापणा-या सेमी हायस्पीड ट्रेनचे गतिमान एक्स्प्रेस असे नामकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ट्रेनमध्ये प्रत्येक आसनाच्या मागे टीव्ही बसवण्यात येणार असून आपत्कालीन ब्रेक यंत्रणाही बसवण्यात येणार आहे.
ताशी १६० किमी वेगमर्यादा असल्यामुळे या ट्रेनला ‘गतिमान एक्स्प्रेस’ असे नाव देण्यात येणार आहे. नव्या रुपातील या एक्स्प्रेसला पुढच्या महिन्यात नवी दिल्ली स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला जाईल.