नवीन वर्षाच्या सुरुवातीला दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.
नवी दिल्ली- नवीन वर्षाच्या सुरुवातीला दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. बुधवारी पोलिसांनी या दोन दहशतवाद्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी मध्यप्रदेशमधील संभळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोन वर्षापासून हे दोघे घरातून बेपत्ता होते. त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग घेतल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांकडून या दहशतवाद्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
दिल्ली पोलिसांच्या विषेश पथकाचे अनेक महिन्यांपासून यांच्यावर लक्ष होते. हे दोन्ही दहशतवादी आपल्या सहका-यांसह नाताळ आणि नव वर्षाच्या सुरूवातीला दहशतवादी हल्ला करणार असल्याचे लक्षात आले. पोलिसांकडून या दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे.
नवीन वर्षाची सुरूवात होण्यासाठी काही दिवसच राहिले असताना दहशतवाद्यांना करण्यात आलेली अटक हे दिल्ली पोलिसांसाठी मोठे यशच आहे.