शाळेत बेवारस बॅग आढळल्याने त्यात बॉम्ब असल्याच्या भीतीने गुरुवारी दिल्लीतील मॉर्डन स्कूल रिकामी करण्यात आली.
नवी दिल्ली- शाळेत बेवारस बॅग आढळल्याने त्यात बॉम्ब असल्याच्या भीतीने गुरुवारी दिल्लीतील मॉर्डन स्कूल रिकामी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या तपासणीनंतर बॅगेत काहीच नसून ती केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
वसंत विहार परिसरातील मॉर्डन स्कूलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती देणारा दूरध्वनी दुपारी बाराच्या सुमारास दिल्ली पोलिसांना आला होता.
त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी विद्यार्थी, कर्मचारी या सर्वाना बाहेर काढून संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली. मात्र तपासणीनंतर या बॅगेत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.
दिल्ली पोलिसांनी याबाबत ट्टिरद्वारेही माहिती दिली. पोलिसांना आलेला हा दूरध्वनी केवळ अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर शाळा पूर्ववत सुरू झाली.