प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाल्याची बातमी सोमवारपासून सोशल साईटवर फिरत आहे.
मुंबई – सोशल साईटवर अनेकदा सेलिब्रेटींविषयी अफवा पसरवल्या जातात. प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाल्याची अफवा सोमवारपासून सोशल साईटवर फिरत आहे. या बातमीमुळे चाहत्यांसोबतच बॉलीवूडमधील इतर कलाकार मंडळीही हैराण झाली होती. मात्र ही केवळ अफवा असून दिलीप कुमार यांची प्रकृती चांगली असल्याचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे.
‘युसुफ साहेब – दिलीप कुमार यांची प्रकृती चांगली आहे. सायरा जी यांनी मला नुकतेच सांगितले की त्यांची प्रकृती ठणठणीत आहे ,’असे अमिताभ यांनी ट्विट केले आहे.
काही दिवसांपूर्वीच सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या विवाह सोहळ्याला दिलीप कुमार आणि त्यांच्या पत्नी सायरा बानू उपस्थित राहिल्या होत्या.
T 1685 – Some baseless rumours being spread about Yusuf Saheb – Dilip Kumar, being ill .. Saira ji just informed me he is perfectly fine !
— Amitabh Bachchan (@SrBachchan)
November 24, 2014