आंतरराष्ट्रीय दहशतवादी व कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय दहशतवादी व कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यासाठी निश्चित कालमर्यादा निश्चित केलेली नाही, असे प्रतिपादन सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी केले.
येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, दाऊदला पकडण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. संबंधित देशांकडून चांगले सहकार्य मिळाल्यास दाऊदही नक्कीच पकडला जाईल. छोटा राजनला अटक करण्यासाठी आम्हाला जागतिक संस्थांचे सहकार्य मिळाले. तो शरण आलेला नाही.
सीबीआय हे राजकीय हत्यार नाही. तसेच माझ्या कारकीर्दीत एकाही राजकीय नेत्याने मला एखाद्यावर मेहरनजर करण्यास सांगितले नाही, असा दावा त्यांनी केला.