भारताला हवा असलेला ‘मोस्ट वाँटेड’ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला ‘आयएसआय’ने पाकिस्तान- अफगाणिस्तान यांच्यादरम्यानच्या सीमा भागात हलवल्याचे गुप्तहेर सूत्रांचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली- भारताला हवा असलेला ‘मोस्ट वाँटेड’ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला ‘आयएसआय’ने पाकिस्तान- अफगाणिस्तान यांच्यादरम्यानच्या सीमा भागात हलवल्याचे गुप्तहेर सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या वीस वर्षापासून पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊदला पकडण्यासाठी भारत आणि अमेरिकन सुरक्षा संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न सुरू केल्यानंतर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने या हालचाली केल्या आहेत.
दाऊद आतापर्यंत कराची शहरातील क्लिफ्टन परिसरात राहत होता. दाऊदचा मुक्काम बदलण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही दाऊदच्या सुरक्षेला धोका असल्याचे संकेत मिळताच आयएसआयने त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले होते.
डी कंपनीवर नजर ठेवून दहशतवादाशी सामना करण्यासाठी भारत-अमेरिका यांच्यातील नव्या सहकार्याबाबत आयएसआय सावध असल्याचे वृत्त आहे. डी कंपनीचे जगभरातील विविध भागांत व्यापारी संबंध आहेत. यातून मिळालेल्या पैशाचा वापर भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जातो. दाऊद इब्राहिम हा मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार आहे.