हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात हनोगी येथे दरड कोसळल्याने किरतपूर-मनाली महामार्ग बंद पडला आहे. सुदैवाने या भागातून त्यावेळी कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
सिमला : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात हनोगी येथे दरड कोसळल्याने किरतपूर-मनाली महामार्ग बंद पडला आहे. सुदैवाने या भागातून त्यावेळी कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की, अवघ्या काही मिनिटांत दरड कोसळून महामार्ग ठप्प झाला. या भागात पाऊस किंवा बर्फवृष्टी झालेली नाही तरीही दरड कोसळल्याबद्दल अभियंते आश्चर्यचकित झाले आहेत. ही दरड १५० मीटरची आहे. ती तोडण्यासाठी चार जेसीबी, अर्थमूव्हिंग मशिन्स कामाला लावले आहेत.