दक्षिण सुदानमधील दोन राज्यात मोठया प्रमाणावर हिंसाचार होत असल्याने तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
जुबा – दक्षिण सुदानमधील दोन राज्यात मोठया प्रमाणावर हिंसाचार होत असल्याने तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष सलवा किर यांनी ही आणीबाणी जाहीर केली .
दक्षिण सुदानमधील युनिटी आणि जोंगलाई या दोन राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहे याच पार्श्वभूमीवर ही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जोंगलाई राज्यातील बोर शहर ताब्यात घेण्यासाठी लष्कर आणि बंडखोर यांच्यात मोठी धुमश्चक्री चालू आहे. यासाठी सुदान सरकारने हजारोंची सैन्यतुकडी तेथे रवाना केली आहे.
दक्षिण सुदान जुलै २०११ मध्ये स्वतंत्र झाल्यापासून जोनग्लेई वांशिक चकमकींचे केंद्र बनले आहे. तसेच संयुक्त राष्ट्राच्या शांतीदूतांचा मुख्य तळ असलेल्या बोर भागातही बंडखोरांचे छुपे हल्ले सातत्याने होत आहेत.