श्रीनगरमधील लाल चौकात दहशत झुगारत जाहीरपणे ‘वंदे मातरम’च्या घोषणा देणा-या ‘त्या’ महिलेचे सुरेश रैनाने कौतूक केले.
मुंबई- श्रीनगरमधील लाल चौकात एका महिलेने दहशत झुगारत जाहीरपणे ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या होत्या. स्वातंत्र्यदिनानिनित्त आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करत धाडस करणा-या या महिलेचे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुरेश रैनाने कौतूक केले आहे.
सुरेश रैनाने आपल्या भावना व्यक्त करत या महिलेला सलाम केला आहे. त्याने ट्विटरवर या महिलेचा व्हिडीओ शेअर करत तिचे कौतूक केले. त्याबरोबर त्याने ‘सुनीता अरोडा खूपच धाडसी असून त्यांना माझा सलाम’ असेही रैनाने लिहिले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुनीता अरोडा या महिलेने जम्मू-काश्मीरमध्ये लाल चौकात ‘वंदे मातरम, भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सुनीता अरोडा यांना लाल चौकात पोहोचण्यासाठी २० चौक्या पार कराव्या लागल्या होत्या. आपण कशासाठी चाललो आहोत हे उघड होऊ नये यासाठी त्यांनी राष्ट्रीय ध्वज पर्समध्ये लपवून नेला होता.
#Kashmiripandit lady chanting “Bharat mata ki jai” in Srinagar on #IndependenceDay! She is a brave heart! Salute! ?? #Peace #Love #Safety ? pic.twitter.com/P0DBpVt9Ce
— Suresh Raina (@ImRaina) August 16, 2017