मुंबईतील तेलवाहिन्यांमधून तेल चोरी होण्याचे गंभीर गुन्हे वाढले आहेत. यावर संबंधित तेल कंपन्यांना सूचना देण्यात येणार आहेत.
मुंबई – मुंबईतील तेलवाहिन्यांमधून तेल चोरी होण्याचे गंभीर गुन्हे वाढले आहेत. यावर संबंधित तेल कंपन्यांना सूचना देण्यात येणार आहेत. प्रसंगी हे गुन्हे रोखण्यासाठी दोषींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिले.
बंदर परिमंडळ हद्दीत वडाळ, शिवडी व यलोगेट परिसरात पेट्रोलियम कंपन्यांचे जाळे आहे. येथे पेट्रोल, डिझेल व कच्चे तेल वाहून नेण्यासाठी तेलवाहिन्या आहेत. येथे मोठय़ा प्रमाणात तेल माफियांकडून तेल चोरी केली जात असल्याच्या गंभीर बाबींवर अजय चौधरी, अमिन पटेल, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आदी सदस्यांनी लक्षवेधी मांडली.
गेल्या वर्षभरात बंदर परिमंडळ हद्दीत तेल चोरीचे एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात एकूण ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे.