सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या कोठडीत असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.
पणजी – सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या कोठडीत असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने शुक्रवारी फेटाळला. याआधी गोवा न्यायालयाकडून तेजपाल यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
तेजपाल यांच्या आई सध्या म्हापसा येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना भेटण्यासाठी तेजपाल यांना परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या परवानगी नुसार पोलिस बंदोबस्तात तेजपाल यांना आईला भेटता येणार आहे.
गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तेजपाल यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या वास्को येथील साडा तुरुंगात आहेत.