सहकारी महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेला तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालला संभाव्य अटकेपासून दिलासा मिळू शकलेला नाही.
नवी दिल्ली – सहकारी महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेला तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालला संभाव्य अटकेपासून दिलासा मिळू शकलेला नाही.
मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने तेजपालला अटकपूर्व जामीन मंजूर केला नाही. या प्रकरणी न्यायालयाने गोवा पोलिसांना नोटीस बजावली असून, बुधवारी तेजपालच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.आपल्या विरोधात राजकीय हेतूने एफआयआर दाखल करण्यात आला असून, यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रमाणापेक्षा जास्त रस घेत आहेत असा आरोप तेजपालने केला आहे.
तसेच प्रख्यात स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि झुबान प्रकाशन संस्थेच्या संचालिका उर्वशी बुटालिया यांनी तहलकाच्या अंतर्गत चौकशी समितीचे प्रमुखपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत त्यामुळे अंतर्गत चौकशी समितीची आवश्यकता नाही असे बुटालिया यांनी म्हटले आहे.