तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी द्रमुक आणि कॉँग्रेसमध्ये अंतिम जागावाटप झाले असून कॉँग्रेस ४१ जागांवर लढणार आहे.
चेन्नई- तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी द्रमुक आणि कॉँग्रेसमध्ये अंतिम जागावाटप झाले असून कॉँग्रेस ४१ जागांवर लढणार आहे. कॉँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी द्रमुकचे एम. करुणानिधी यांची भेट घेतली.
या वेळी या जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागा असून १६ मे रोजी मतदान होणार आहे तर १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
दीर्घ चर्चेनंतरच आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. जागा वाटपावेळी कॉँग्रेसमधील आणि द्रमुकमधील काही नेत्यांबरोबरही चर्चा झाल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.