दाऊद इब्राहिम भारतीय होता. जर त्याच्या कुटुंबियांसोबत काही घडले तर मानवतेच्या दृष्टिकोनातून मोदींना मदत करणा-या स्वराज दाऊद इब्राहिमला मदत करतील का असा सवाल त्यांनी यावेळी केला.
नवी दिल्ली – आयपीएलचे निलंबित अध्यक्ष ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनीही या प्रकरणावर स्वराज यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
दाऊद इब्राहिम भारतीय होता. जर त्याच्या कुटुंबियांसोबत काही घडले तर मानवतेच्या दृष्टिकोनातून मोदींना मदत करणा-या स्वराज दाऊद इब्राहिमला मदत करतील का असा सवाल आपचे नेते आशुतोष यांनी यावेळी केला.
स्वराज यांनी आपली चूक मान्य केली आहे. मात्र आता इथे हा प्रश्न आहे की मोदी त्यांना कॅबिनेटमध्ये ठेवणार की नाही असे आशुतोष यांनी सांगितले.
मोदींना भारतात परत येण्यासाठी प्रवासासंदर्भातील कागदपत्रे मिळवून देण्यासाठी स्वराज यांनी मदत केली होती. मात्र आपण ही मदत केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून केल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केले.
स्वराज यांच्या मदत प्रकरणावरुन सर्वच पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र सरकार, भाजपा तसेच आरएसएसने स्वराज यांची पाठराखण केली आहे.