बिहारमधील विजयावर संयुक्त जनता दलाचे प्रमुख नेते शरद यादव यांनी हा तत्वांचा पैशावर विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली – बिहारमधील विजयावर संयुक्त जनता दलाचे प्रमुख नेते शरद यादव यांनी हा तत्वांचा पैशावर विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
ही अत्यंत कठिण अशी लढाई होती. एका बाजूला पैशाच्या थैल्या तर, दुस-या बाजूला तत्व होते. हा तत्वांचा पैशावर विजय आहे. आम्ही १५० पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास शरद यादव यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल मिळून जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवेल अशी प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती यांनी दिली.
प्रारंभीच्या मतमोजणीच्या फे-यांमध्ये भाजपाला मोठी आघाडी मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पाटण्यातील मुख्यालयाबाहेर फटाके फोडण्यास, शंखनाद करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर तिथे शांतता पसरली आहे.
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने निकालाचे विश्लेषण केले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली.
बिहारमधील यावेळच्या मतदानाचा पॅटर्न वेगळा आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळया पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले – प्रकाश जावडेकर