ढोणीने 2013 मध्ये होणा-या एफआयएम सुपरस्पोर्ट वर्ल्ड चँपियनशिप बाईक रेसिंग टीमची घोषणा मंगळवारी केली.
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग ढोणीने 2013 मध्ये होणा-या एफआयएम सुपरस्पोर्ट वर्ल्ड चँपियनशिप बाईक रेसिंग टीमची घोषणा मंगळवारी केली.
पुढील वर्षी मार्च महिन्यात जागतिक बाईक रेसिंगची (वर्ल्ड सुपरबाईक चँपियनशिप) स्पर्धा होणार आहे. ‘एमएसडी आर-एन रेसिंग टीम इंडीया’ असे धोनीच्या टीमचे नाव आहे. दर मोसमात बाईक रेसींगच्या 17 स्पर्धा होतात. त्यातील चेक प्रजासत्ताकमधील बर्नो येथे होणा-या दहाव्या रेसमध्ये धोनीची टीम सहभागी होणार आहे.
ढोणीच्या टीममध्ये दोन रायडर्स आहेत, यामध्ये फ्रान्सचा फ्लोरियन मारिनो व ग्रेट ब्रिटनचा डान लिनफूटचा समावेश आहे.
सुपरस्टॉक 600 रेसमधील स्पर्धेत मारिनो चार वेळा तर गेल्या वर्षी होंडा डब्ल्यूएसएस रायडर स्पर्धा जिंकली आहे. तर लिनफूट 2008 मध्ये दोन वेळा सुपरस्टॉक 600 रेस विजेता ठरला आहे.