गृहनिर्माण संस्थांनी लवकरात लवकर आपल्या नावे डीम्ड कन्व्हेअन्स करून घ्यावे. कारण ते शंभर टक्के गरजेचे आहे, असे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन व ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी सांगितले.
ठाणे – गृहनिर्माण संस्थांनी लवकरात लवकर आपल्या नावे डीम्ड कन्व्हेअन्स करून घ्यावे. कारण ते शंभर टक्के गरजेचे आहे, असे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन व ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी सांगितले.
१९६३च्या मोफा कायद्यात सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर चार महिन्यांच्या अवधीत सोसायटयांची नावे कन्व्हेअन्स करून देण्याचे बंधन विकासकांना करण्यात आले होते. तरी राज्यातील तब्बल ९९ हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांपैकी जेमतेम सहा हजार गृहनिर्माण संस्थांचेच नाव कन्व्हेअन्स झाल्याने सरकारने ‘मोफा’ कायद्याला डीम्ड कन्व्हेअन्सची तरतूद असणारी दुरुस्ती सुचवली, मात्र ती लवकरात लवकर मंजूर करून हजारो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळावा म्हणून ठाणे डिस्ट्रीक्ट हाउसिंग फेडरेशनने प्रयत्न केले.
एवढेच नव्हे, तर कन्व्हेअन्सची प्रक्रिया जलदगतीने व सुलभ व्हावी म्हणून योगदान दिले, अशी माहिती भाईंदर पूर्व येथे आयोजित गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींच्या मेळाव्यात राणे यांनी दिली. या प्रसंगी ठाणे तालुक्याचे उपनिबंधक संतोष बिडवई उपस्थित होते.