महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रुग्णमित्र संस्थेतर्फे ‘डायलिसिस काल-आज-उद्या’ हा माहितीपट बनवण्यात आला असून रविवार ८ मे रोजी सायंकाळी ५.३० वा. माहीम सिटीलाईट सिनेमागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रुग्णमित्र संस्थेतर्फे ‘डायलिसिस काल-आज-उद्या’ हा माहितीपट बनवण्यात आला असून रविवार ८ मे रोजी सायंकाळी ५.३० वा. माहीम सिटीलाईट सिनेमागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या मराठी माहितीपटाचे अनावरण होणार आहे.
डायलिसिसबाबत उपयुक्त माहिती देणारा मराठी माहितीपट रुग्णमित्र निर्मित जितेंद्र विष्णू तांडेल यांनी बनवला आहे. नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांच्या पुढाकाराने सिटीलाईट सिनेमागृहात या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाला मनसेचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस आदित्य शिरोडकर, महिला आघाडी सरचिटणीस रिटा गुप्ता, महिला उपाध्यक्षा स्नेहल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.