ठाणे परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत लोकशाही आघाडीचे शैलेश भगत विजयी झाले आहेत.
ठाणे- ठाणे परिवहन समिती सभापतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, आरपीआय, अपक्षांच्या लोकशाही आघाडीचे उमेदवार शैलेश भगत यांनी युतीचे उमेदवार प्रकाश कदम यांचा पराभव केला.
यामुळे चिडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी राडेबाजी करून उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण करून त्यांच्या कार्यालयाची मोडतोड केली. भाजपच्याही नाराजीनंतर पाटणकर यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला.
गेल्या आठवडयात परिवहन समिती सभापतीपदासाठी अर्ज भरताना शिवसेनेचे शैलेश भगत यांनी बंडखोरी करीत आघाडीकडून अर्ज भरला. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू होते. भाजप सदस्य अजय जोशी यांनी आघाडीला पाठिंबा दिल्याने आघाडीला चार, तर शिवसेना-भाजप युतीला तीन मते पडली.
या वेळी कॉँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर आदी उपस्थित होते.
[EPSB]
ठाणे महापालिकेत शिवसेनेला खिंडार
शिवसेनेचे परिवहन सदस्य शैलेश भगत यांनी राष्ट्रवादीकडून परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी पालिका मुख्यालयासमोर हाणामारी झाली.
[/EPSB]