उरण येथील महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही सबस्टेशनच्या जीटीपीएस ट्रान्सफॉर्मरला गुरुवारी सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास भीषण आग लागली.
उरण- उरण येथील महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही सबस्टेशनच्या जीटीपीएस ट्रान्सफॉर्मरला गुरुवारी सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास भीषण आग लागली.
यात ट्रान्सफार्मर जळून खाक झाला. यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत झाला असून ऐन दिवाळीत संपूर्ण तालुका दोन दिवस अंधारात राहणार असल्याचे समजते.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा वीज खंडीत झाला आहे. दोन दिवस वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे समजते.