‘टेक केअर गुड नाइट’ (टीसीजीएन) या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित करण्यात आला.
मुंबई- ‘टेक केअर गुड नाइट’ (टीसीजीएन) या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेल्या ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते.
गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांनी त्याला संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.
[EPSB]
या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.
या चित्रपटाची प्रस्तुती करत असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो,हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी या काही चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती कंपनीने केली आहे.