झारखंडचे मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह तीन माजी मुख्यमंत्री निवडणुकीत पिछाडीवर आहेत. रांची – झारखंडचे मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह तीन माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या मतमोजणीत पिछाडीवर आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेले माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे खरसावा मतदारसंघातून १२९० मतांनी पिछाडीवर आहेत. या मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे दशरथ गाग्री आघाडीवर आहेत.
सकाळी आठ वाजल्यापासून झारखंडमधील ८१ जागांवरील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन दुमका मतदारसंघातून तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत.या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लुई मरांडी यांना पाच हजार २१२ मते मिळाली आहेत तर सोरेन यांना एक हजार ७७९ मते मिळाली आहेत. तर माजी मुख्यमंत्री मधू कोडा माझगाव मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
झारखंडचे आणखी एक माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी गिरिध आणि राज धनवर या दोनही मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. गिरिध मतदारसंघातून भाजपचे निर्भय शबादी १३ हजार ८१ मतांनी आघाडीवर आहेत तर बाबुराव मरांडी यांना सात हजार २७२ मते मिळाली आहेत. धनवर मतदारसंघातूनही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार राज कुमार हे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. मरांडी यांना ११ हजार १८५ मते मिळाली आहेत.