मध्यप्रदेशातील झांबुआ जिल्ह्यातील पेटलावाड शहरात शनिवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र कासवा याला मध्यप्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातून अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे.
इंदूर – मध्यप्रदेशातील झांबुआ जिल्ह्यातील पेटलावाड शहरात शनिवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र कासवा याला मध्यप्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातून अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे.
पेटलावाड-थांडला महामार्गावरील एका बंद दुकानात ठेवलेल्या स्फोटक साहित्याचा शनिवारी भीषण स्फोट होऊन त्यात १०० निष्पाप नागरीकांचा बळी गेला होता. राजेंद्रची पत्नी प्रमिला, मुलगा शुभम आणि मुलगी सोनिया यांना मंगळवारी रात्री इंदूरजवळच्या मानपूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस पथक राजेंद्रला अटक करण्यासाठी महाराष्ट्राकडे रवाना झाले.
राजेंद्रचा भाऊ फुलचंद आणि नरेंद्रलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कासवाला अटक केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी अद्याप दुजोराही दिलेला नाही किंवा नाकारलेलेही नाही. त्याला कलम ३०४ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
कासवाला स्फोटक साहित्य पुरवणा-या धर्मेंद्र राठोडलाही पोलिसांनी अटक केली आहे. धार जिल्ह्यातील बडनावर येथून त्याला अटक करण्यात आली. स्फोटक साहित्य साठवण्याचा त्याच्याकडे परवाना होता तसेच छोटी राहेंडी गावामध्ये त्याचे गोदामही आहे.