प्रसिद्ध मराठी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, लेखक आणि अनुवादक म. द. हातकणंगलेकर यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले.
सांगली- प्रसिद्ध मराठी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, लेखक आणि अनुवादक म. द. हातकणंगलेकर यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.
तब्येतीच्या तक्रारीमुळे शनिवारी रात्री त्यांना सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. हातकणंगलेकर यांचा जन्म १९२७ साली इचलकरंजीतील हातकंणगले येथे झाला होता.
सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात १९५६ मध्ये ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. १९७३ मध्ये ते याच महाविद्यालयात प्राचार्य झाले. १९७८ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. तसेच मराठीतील अनेक लघुकथांचा इंग्रजी अनुवादही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक संस्थांशी त्यांचा संबंध होता.
हातकणंगलेकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.