आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांचे पुण्यात वृद्धापकाळानेनिधन झाले. ते 87 वर्षाचे होते.
पुणे- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांचे पुण्यात वृद्धापकाळानेनिधन झाले. ते 87 वर्षाचे होते.
डॉ. शरच्चंद्र गोखले यांनी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थात काम पाहिले. तसेच त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने काम करणारे व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करणा-या डॉ. शरच्चंद्र गोखले यांनी पुस्तकाद्वारे विपूल लेखन करीत समाजातीव वास्तव समोर आणण्याचे काम केले होते.
कास्प, आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था (आय एल यू), व आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र (आय एल सी) या संस्थाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. युनायटेड नेशन्स, यूनिसेफ, डब्ल्यू. एच. ओ. या आंतरराष्ट्रीय संस्थात सल्लागार म्हणून पाहिले. या निमित्ताने त्यांनी श्रीलंका, बांगला देश, फिलिपाइन्स, कोरिया, नेपाळ या देशांत काम केले.
भारत सरकारच्या वयोवर्धन धोरण समितीचे सभासद, भारतीय समाजकल्याण संस्थेच्या भारताच्या प्रमुखपदी नेमणूक, भारत सरकारचे सल्लागार, आंतरराष्ट्रीय समाजकल्याण संस्थेच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाचे प्रमुख तसेच असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
गोखले यांनी मराठी आणि इंग्रजीत एकूण 45 पुस्तके लिहली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचे चिनी आणि फ्रेंच भाषांतर करण्यात आले आहे. अनेक पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. गोखले यांनी केसरी व तीन इंग्रजी मासिकांचे संपादक म्हणून काम पाहिले होते.
यूनोल संबोधित करण्यासाठी सेक्रेटरी जनरल यांचे निमंत्रण. हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय जे. आर. डी. टाटा यांच्यानंतर डॉ. गोखले हे दुसरे भारतीय ठरले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कारही गोखले यांना मिळाला होता. याचबरोबर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.