ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाला असून त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
मुंबई- प्रकृती बिघडल्याने ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आहे. अमरापूरकर यांच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.