कर्नाटक विधानसभा निवडणूकीत अनपेक्षितरित्या दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळूरु – कर्नाटक विधानसभा निवडणूकीत अनपेक्षितरित्या दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला आहे.
जनतेने जर आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला असेल, तर आम्ही विरोधी पक्षात बसू असे जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी यांनी पत्रकारांना सांगितले. जेडीएसने आतापर्यंत दोन जागांवर विजय मिळवला असून, ३९ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. जेडीएसने फक्त आपला बालेकिल्लाच राखला नाही तर, अनेक मतदारसंघात भाजपला धक्का दिला.
आम्ही विरोधीपक्षात बसू आणि लोकांच्या हिताचे रक्षण करु, आम्ही पराभव मान्य करतो. लोकांनी आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा आदेश दिला आहे असे कुमारस्वामी म्हणाले. भाजपशी पडद्याआडून हातमिळवणी झाल्याच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते चांगलेच संतापले. आम्ही भाजपला कुठे मदत केली ? आम्ही भाजपशी कुठे हातमिळवणी केली ? ते सांगा. हा काँग्रेसचा विजय नसून, प्रसारमाध्यमांचा विजय असल्याचे ते म्हणाले.