डीडीसीएमधील गैरव्यवहाराबाबत चुकीचे आरोप केल्याने केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
नवी दिल्ली- दिल्ली डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनमधील (डीडीसीए) गैरव्यवहाराबाबत चुकीचे आरोप केल्याने केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
जेटली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केजरीवाल यांच्यासह कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा आणि दीपक वाजपेयी यांच्याविरोधात खटला दाखल केला. त्यामुळे हे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आपने या खटल्याविरोधात बोलतांना आपण याला घाबरत नसल्याचे म्हटले आहे. भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी आपल्यावर खटला दाखल करण्याचे आव्हान जेटलींना दिले आहे.
अरुण जेटली १३ वर्षे अध्यक्ष असलेली दिल्ली डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन म्हणजे भ्रष्टाचाराचे भयंकर आगर होते. डीडीसीएने बनावट कंपन्यांना कंत्राटे देऊन कोटय़वधींचे गैरव्यवहार केल्याचा घणाघाती आरोप आझाद यांनी केला आहे.
[EPSB]
अर्थमंत्री जेटलींचा बुरखा कीर्ती आझाद यांनी टराटरा फाडला
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली १३ वर्षे अध्यक्ष असलेली दिल्ली क्रिकेट संघटना (डीडीसीए) म्हणजे भ्रष्टाचाराचे भयंकर आगर होती.[/EPSB]