जपानची राजधानी टोक्योला शनिवारी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरवून सोडले.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/09/earthquake.jpg)
टोक्यो – जपानची राजधानी टोक्योला शनिवारी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरवून सोडले. टोक्योमधील रहिवाशी इमारती आणि कार्यालयांमध्ये मिनिटभरासाठी या भूकंपाचे हादरे जाणवले.
स्थानिक प्रमाणवेळेनुसार ८.३० च्या सुमारास हे धक्के जाणवले. टोक्योपासून ८७४ कि.मी. अंतरावर प्रशांत महासागरात या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय प्रयोगशाळेने दिली आहे.
या भूकंपामुळे त्सुनामीचा कुठलाही धोका नाही. भूकंपामुळे नेमके किती नुकसान झाले ते लगेचच स्पष्ट झालेले नाही. दिल्लीसह उत्तर भारताताही अनेक भागांमध्ये भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले.